Suryakanya

आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आधुनिक युगातील समस्या, अडचणी आणि दुःख यांना प्राचीन ज्ञानाच्या आधाराने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं.

मुखपृष्ठ ब्लॉग

ब्लॉग तपशील

29 July

नागपंचमी : आरोग्य आणि अध्यात्म साधणारा सण

श्री देवनाथ महाराज अंतुर्ली यांच्या चिंतनातून नागपंचमी हा एक श्रावण मासातील महत्वाचा सण आहे. या सणा बद्दल बरेच समज गैरसमज बघायला मिळतात. म्हणून आपण यास तीन प्रकाराने समजून घेऊ.

पुराणकाळ - नागपंचमी ची पुराणकथा बघितली तर लक्षात येते की त्यावेळी शेती हा प्रमुख उद्योग होता. आजच्या सारखी त्यावेळी यंत्रणा नव्हती. खूप कष्ट करावे लागत असत. नागर, वक्खर, कुदळ, कोयता, कुऱ्हाड, पावडे अशी अवजारे उपलब्ध होती. शारीरिक श्रम खूप होते. यात सर्प, बेडूक, डुक्कर, उंदीर, पक्षी आधी शेती मध्ये वास्तव्य करीत असत. त्यांचा उपद्रव होत असल्याने ते मारले जायचे. पण ते शेतकरी चे मित्र आहे. त्यांचे रक्षण झाले पाहिजे. ते होण्याच्या दृष्टीने त्यांना पूजेत आणले. त्यामुळे आज ही लोक सर्प मारत नाही. सर्प मित्र बोलवून त्यांना बाहेर सोडून देतात.जीवांचे रक्षण हा उद्दात हेतू यातून स्पष्ट होतो.

आरोग्य महत्व - नागपंचमी हा सण ज्या ऋतू मध्ये येतो तो लक्षात घेता यावेळी आपले आरोग्य हे बिघडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आषाढ मासात पदार्थ तळून खातात तर श्रावणात उकडून खावे.

तवा न ठेवणे, भाजी न चिरणे, असे काही नियम नागपंचमी चे दिवशी लोक पाळतात. यामागे आपले आरोग्य हा मोठा उद्देश आहे. भरपूर पाऊस पडल्याने पानी दूषित होते. ते पोटात गेल्याने अनेक विकार, संसर्ग होतात. उलटी, जुलाब सारखे आजार वाढतात. अशा वेळी आपला आहार कसा असावा हे या सणाचे निमित्याने पाळले जाते. नाग पंचमी म्हणजे आपले पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिये, पंच महाभूत, पंचप्राण, पंचविषय असा पाच तत्वाचा पाचाचा मेळा. अर्थात पंचीकरण. या सर्वांना नीट राखणे हिच काय ती नागपंचमी. नाग हे विषयाचे प्रतीक असल्याने नाग शब्द वापरला गेला. इंद्रिय व विषय यांचा संबंध असल्याने त्यांनाच नाग ही उपमा दिलेली दिसते.

अध्यात्मिक महत्व - नागपंचमी चे अध्यात्मिक महत्व मोठे आहे. योगशास्त्राचे दृष्टीने बघितले तर हे कुंडिलिनीचे पूजन आहे. नागिणीची पिले l कुंकुमे नहाले l असे माऊली वर्णन करतात. नाग ज्या प्रमाणे फणा काढून बसतो ते एक आसन आहे. वेटोळे हे एक कुंड आहे जे तेजाचे असते. व फणा हा त्या तेजाचा उर्ध्व प्रवास आहे. शिवजी चे गळ्यात नाग हे त्याचेच प्रतीक आहे. आजच्या मुहूर्तावर योगी ही योगक्रिया आरंभ करतो. किंवा शिवाचे पार्वती सहित पूजन करतो.

गुरू चरित्रात एक कथा आली आहे सीमंतिनी आख्यान म्हणून. त्यात ती सोमवार चे व्रत करते. तिचा पती नदीत बुडतो तो पाताळात जातो. जिथे नागलोक आहेत. ते त्याचे रक्षण करतात त्याला अमृत देतात. व परत आणून सोडतात. यावरून हे स्पष्ट होते की नाग अर्थात सर्प नसून ती एक मनुष्य जात होती. श्रीमद भागवत ग्रंथात राजा परीक्षिती ज्या तक्षक नागा मुळे मृत्यू पावतो ती कथा बोलकी आहे. तक्षक, वासुकी, कालिया, धृतराष्ट,, शेषनाग, पद्म, अशी प्रसिद्ध नागराजांची नावे पुराणात आढळतात. थोडक्यात नाग ही एक योगशास्त्र म्हणून बघितले तर अमृत प्राप्ती होते. नागाचे फणीवर नागमणी असतो अशी एक कथा आयकायला मिळते. पण हे कुंडलिनीचे वर्णन आहे. कालपरत्वे यात वेगवेगळे भाव जोडले गेले आणि या उत्तम सणाला वेगळे रूप दिले गेले. म्हणून सर्प वाचवा आणि निसर्ग जपा तोच देव आहे.

जय श्रीनाथ

Suryakanya
Anturli, Jalgaon district